Red Eye Remover ने फोटो रीटच करा
लाल डोळे दुरुस्त करा आणि एका झटपट टॅपमध्ये फोटोंमधील डोळ्यांचा नैसर्गिक रंग परत मिळवा.
- जपून ठेवण्यासारखा क्षण जतन करा

फोटोंमधील लाल डोळे झटपट काढा
लाल डोळ्यांमुळे फोटो खराब होतात. हे खरं आहे. हौशी फोटोग्राफरपासून अनुभवी व्यावसायिकांपर्यंत, ते कोणाच्याही डोक्याला ताप ठरू शकतात. पण लाल डोळे आले म्हणजे सगळंच बिघडलं असं नाही. Red Eye Remover टूलने फोटो रीटच करा आणि जवळजवळ परिपूर्ण असलेले शॉट्स क्षणात पुन्हा मिळवा. Picsart च्या तज्ज्ञांनी विकसित केलेल्या खास AI-आधारित तंत्रज्ञानाने सेल्फी, पोर्ट्रेट आणि ग्रुप फोटो सुधारून घ्या. काही सेकंदांत व्हॅम्पायरसारखा लुक दूर होईल आणि डोळ्यांना त्यांचा नैसर्गिक रंग परत मिळेल. फोटो पुन्हा काढण्याची किंवा डिलीट करण्याची गरज नाही—Picsart वापरून लाल डोळे काढा.

लाल डोळे दुरुस्त करा आणि आवडते फोटो जतन करा
मित्रांसोबत मैदानी कॉन्सर्टचा आनंद घेताना. शेकोटीजवळचे निवांत क्षण टिपताना. क्लबमध्ये वाढदिवस साजरा करताना. या सगळ्यांमध्ये काय समान आहे? कमी प्रकाश आणि अंधुक वातावरण. त्रासदायक लाल डोळे फोटो खराब करण्यासाठी अगदी योग्य परिस्थिती. चांगली गोष्ट म्हणजे, ते सहज काढून टाकता येतात आणि फोटो असे शेअर करता येतात की जणू काही दुरुस्त करण्यासारखं होतंच नाही. Picsart Red Eye Remover टूल वापरून तुम्ही किती फोटो संपादित करू शकता यावर कोणतीही मर्यादा नाही. सुधारण्याची गरज असलेले सगळे फोटो निवडा, डोळ्यांचा नैसर्गिक रंग परत मिळवा आणि हवे तिथे शेअर करा. फोटो वाचवण्यासाठी हे टूल गेमचेंजर आहे.
- आवडते पोर्ट्रेट पुन्हा वापरण्यायोग्य बनवा

लाल डोळे काढणे सोपे आहे
लाल डोळे काढणे अवघड वाटू शकते, पण Red Eye Remover टूलमुळे Picsart ने ते अतिशय सोपे केले आहे. सुधारायचे फोटो अपलोड करा, Red Eye tool निवडा आणि AI ला त्याची जादू करू द्या. हे टूल लाल डोळे आपोआप शोधण्यासाठी तयार केले आहे; अधिक अचूकतेसाठी तुम्ही ते हातानेही समायोजित करू शकता. नशिबाला दोष देत जवळजवळ चांगले असलेले फोटो बाजूला ठेवण्याचे दिवस आता लवकरच संपतील.

Picsart वापरून लाल डोळे आणि इतर त्रुटी काढा
तुमचे फोटो लाल डोळ्यांपासून मुक्त होण्यासाठी फक्त एका टॅपच्या अंतरावर आहेत. Picsart तुम्हाला लाल डोळे आणि इतर त्रुटी क्षणात काढायला मदत करू शकते. Red Eye Remover टूलसह अनेक शक्तिशाली सुविधा Photo Editor मध्ये मिळतील. Crop tool वापरून तुमच्या इमेजचा आकार बदला, Background Remover वापरून नको असलेले घटक काढा आणि आणखी बरेच काही करा. लाल डोळे दुरुस्त करण्यासाठी आणि उच्च-गुणवत्तेचे संपादन करण्यासाठी Picsart ला तुमचा आवडता पर्याय बनवा.
- अॅपमध्ये फोटो आणखी सुधारत राहा

Picsart बद्दल प्रसिद्धीमाध्यमांत
स्वच्छ पोर्ट्रेट आणि सोशल पोस्टसाठी फोटो रीटच करा
Pro
Most popularAI tools for everyday creative work.
Ultra
Most powerfulHeavy AI usage for creators & teams.